कोळंब कातवड येथे आंबा बागेला आग लागून नुकसान

⚡मालवण ता.२२-: कोळंब कातवड येथील लक्ष्मण मुरलीधर भगत यांच्या सामाईक मालकीच्या हापूस आंबा बागेला सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत भगत यांची १०० हापूस आंबा कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

कोळंब कातवड येथे वायरी येथील लक्ष्मण भगत, दिनेश हुर्णेकर, मनोज हुर्णेकर यांची सामाईक मालकी असलेली हापूस आंबा बाग आहे. यात भगत यांच्या या बागेला आग लागली. स्थानिकांनी या घटनेची माहिती वायरी येथील लक्ष्मण भगत यांना दिली. त्यानंतर भगत यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत बागेतील हापूस आंबा कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या आगीत बागेतील पाईप लाईनही जळाली. लक्ष्मण भगत यांनी या नुकसानीची माहिती कोळंब तलाठी कार्यालय येथे दिली.

You cannot copy content of this page