मालवण तालुका मनसेची २४ नोव्हेंबरला बैठक

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक गुरुवार २४ नोव्हेंबर सकाळी साडेदहा वाजता मालवण पंचायत समिती नजीक असणाऱ्या हॉटेल विशाल येथे आयोजित करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३० नोव्हेंबर रोजी होत असलेला कोकण दौरा व आगामी ग्रामपंचायत निवडणूक या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी मालवण शहर व तालुक्यातील मनसे, मनविसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page