⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: रेडी गावची ग्रामदैवत व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या बुधवार २३ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी श्रीदेवी माऊली व परिवार देवतांची पूजा, उत्सव मूर्ती सजावट, त्यानंतर ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमास प्रारंभ. स. ११:०० वाजल्यानंतर देवीच्या साड्यांचा रात्री पुराण वाचन व .देवी समोरील कुवाळा ज्योतीचा विधी, रात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीदेवी माऊलीची पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोसवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
