चर्मकार समाज माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण भाजपात

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यातील शिरवल चव्हाणवाडी येथील शिवसेना उद्धव ठाकरे
पक्षाचे चर्मकार समाज माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र शांताराम चव्हाण, व इतरांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्के मिळत आहेत. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.

यावेळी आम. नितेश राणे, सरपंच
महेश शिरवलकर , पंढरी शिरवलकर, राजन सावंत, सूचित गुरव,विलास मेस्त्री, ज्ञानेश्वर शिरसाट, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नामदेव जाधव ,रुपेश चव्हाण उपस्थित होते.

You cannot copy content of this page