मराठा मंडळ रस्त्याचे काम त्वरित सुरू न केल्यास आंदोलन

विरोधी गटनेता सुशांत नाईक यांचा
इशारा

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ हा हॉटमिक्स रस्ता मंजूर होऊन 6 महिने उलटून गेलेत मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. येत्या 8 दिवसांत या रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या प्रभागाचे नगरसेवक तथा विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
हा रस्ता सध्या पूर्ण खड्डेमय झाला असून रस्त्याच्या नूतनीकरण साठी 18 लाखांचा निधीही मंजूर आहे. स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. येत्या 8 दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page