देवगड येथे जागतिक मत्स्यदिन साजरा

⚡देवगड ता.२१-: जागतिक मत्स्यदिन २१ नोव्हेंबर औचित्य साधून रिलायन्स फाउंडेशन सिंधुदुर्ग विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांना तारामुंबरी सहकारी मच्छि व्यावसायिक संस्था मर्यादित देवगड यांचे कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय सहा. आयुक्त रत्नाकर राजम ,मत्स्यपरवाना अधिकारी रवींद्र मालवणकर,शासकीय योजना प्रसारक श्री बहर रिलायन्स फाउंडेशन प्रतिनिधी श्री गावडे ,तारामुंबरी संस्था अध्यक्ष विनायक प्रभू,देवगड फिशरमेन्स व्हॉइस चेअरमन उमेश आंबेरकर,,यांत्रिक चालक मालक संघटना अध्यक्ष जगन्नाथ कोयंडे, देवदुर्ग मच्छिमार संस्था सचिव कृष्णा परब,विजयदुर्ग ग्रा प उपसरपंच महेश बिडये कांदळवन प्रकल्प प्रतिनिधी लक्ष्मण तारी, मच्छिमार ,नौका मालकसागरी सुरक्षा रक्षक,उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी मच्छिमारांना जागतिक मच्छिमार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून मच्छिमारांच्या शासकीय योजना पंतप्रधान मत्स्य संपदा योजना,रत्नसिंधु योजना माहिती देऊन मत्स्यव्यवसाय खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच योजनांची माहिती स्क्रीनवर दाखविण्यात आली .त्याचबरोबर घटत्या मत्स्य उत्पादनात मच्छिमारांनी मत्स्यपुरक व्यवसायाकडे वळावे ,या योजनाचा फायदा घ्यावा.आणि त्यातून रोजगार निर्माण करावा.असे मार्गदर्शन केले.प्रास्तविक व आभार तारामुंबरी संस्थेचे व्यवस्थापक अरुण तोरस्कर यांनी मानले.

You cannot copy content of this page