सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ व माझी वसुंधरा, वॉर्ड सौंदर्यीकरण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

याकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा २३/११/२०२२ पासून घेण्या येणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गटनिहाय विविध स्पर्धा पुढीलप्रमाणे १)चित्रकला स्पर्धा २)भितीचित्र स्पर्धा ३) पथनाट्य स्पर्धा ४)जिंगल स्पर्धा ५) शॉर्टफिल्म स्पर्धा (रील्स) ६)स्वच्छ इनोव्हेटिव्ह स्पर्धा ७) स्वच्छता चैम्पियन पुरुष/स्त्री) ८)आत्मनिर्भर वॉर्ड स्वच्छ वॉर्ड १०) स्वच्छ हॉटेल १९)स्वच्छ अपार्टमेंट १२) स्वच्छ शासकीय कार्यालये १३)स्वच्छ शाळा १४)व्यावसायिक कॉम्प्लेक्स १५)स्वच्छ हॉस्पिटल १६)कचन्यापासून कलाकृती स्पर्धा आदी स्पर्धा होणार आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांनी सदर स्पर्धेत सहभाग घ्यावा असे सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी व टोल फ्री क्रमांक 18002332047 शी संपर्क करावा.

You cannot copy content of this page