राष्ट्रवादी अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष पदी झाली आहे निवड
⚡सावंतवाडी ता.२१-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब सिराज मेहंदी हे पुणे शहर दौऱ्यावरती आले होते नुकतीच त्यांची अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली आहे त्यादृष्टीने नविन अध्यक्ष म्हणून प्रथमच त्यांचा पुणे दौरा होता त्यानिमित्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहर रा का पा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष समीर_शेख याणी त्यांचा सत्कार करून पूढील कार्यासाठी सिराज मेहंदीना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश समन्वयक जनाब नसीमसिद्दीकी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेदहबीब , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच पुणे पिंपरी चिंचवड तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक सुलतानमालदार, श्री शफीक भाई खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जनाब इकरामभाईजान* राष्ट्रीय सचिव अल्पसंख्यांक विभाग जनाब आसिफ ख्वाजा, राष्ट्रीय महा सचिव अल्पसंख्यांक विभाग एड फैसल मेमन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय संयुक्त सचिव डॉ् साजिद अहमद, श्री सोहेल खान (अध्यक्ष पुणे ग्रा), एड साजिद मोमिन, श्री ध्यारियशील काकडे, शफीक भाई (अध्यक्ष सतारा जी), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री राशिद खान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग नवी मुंबई उपाध्यक्ष श्री जावेद अश्रफी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे देवगड तालुका अध्यक्ष श्री मोहम्मद हनिफ काजी. श्री फिरोज नवाब, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय एंव प्रदेश पदाधिकार पुणे शहर पदाधिकारी कार्यकर्ते मोठी संख्या उपस्थीत होते.
