शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेत पक्ष प्रवेश
⚡कणकवली ता.२१-: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढीचे विद्यमान चेअरमन संदीप लहु कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपनेत्या प्रा . सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने पक्ष प्रवेश करणार आहेत.
राज्य सरकारचा सन्मानाचा समाजसेवा केल्याबाबतच “डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ” प्राप्त असलेले, तसेच राज्यसरकारचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आजिवन “विशेष कार्यकारीअधिकारी ” म्हणुन नियुक्ती मिळालेले, विद्यमान सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत .तसेच कर्मचारी संघटनांचे गेली बावीस वर्षे नेतृत्व करत असलेले शाहु, फुले , आंबेडकर चळवळीतील बुलंद वक्ते , डॅशिंग नेतृत्व करणारे आणि बारा वर्षे काँग्रेस पक्षात सक्रीयपणे काम करताना काँग्रेसच्या प्रमुख जेष्ठ नेत्यांसोबत जिल्हाभर जाहिर सभांमध्ये स्टार प्रचार करणारे वक्ते म्हणून त्याची ओळख आहे
, तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढीचे विद्यमान चेअरमन संदीप लहु कदम हे आहेत . त्यांचे शिक्षण, आरोग्य , सहकार , माथाडी कामगार ,सफाई कामगार तसेच शाहु ,फुले , आंबेडकर चळवळीत सक्रियपणे काम करणारे महत्वपूर्ण सुपरिचित नेते म्हणुन त्यांची जिल्हात ओळख आहे .
