⚡मालवण ता.२०-: सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी लि. मालवण या पोस्टल कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून विजयं चिपकर, उपाध्यक्ष दिनकर मेस्त्री, सचिव अजय लाड, खजिनदार महेश आर्लेकर यांची निवड करण्यात आली.
सदरची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण येथील प्रधान डाकघर येथे झाली. यावेळी नवीन संचालक म्हणून अजय लाड, महेश आर्लेकर, अशोक गावडे, महेंद्र जगताप, बालाजी मुंडे, विजय चिपकर, राजेश चिपकर, दिनकर मेस्त्री, मंगेश मोरये, विठ्ठल शेलटकर, शरयू परब, नीलेश ठाकूर, रवींद्र घोगळे यांची निवड करण्यात आली.
