विशाल परब;कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थाच्यावतीने अभंगवाणी कार्यक्रम संपन्न*
⚡सावंतवाडी ता.२०-: भजन क्षेत्राचा समाज प्रबोधन करण्यात जो मोठा वाटा आहे त्याची तुलना आपण कशाचीच करू शकत नाही त्यामुळे भजनाद्वारे जे तुम्ही कार्य करता ते ईश्वर कार्य आहे, असे प्रतिपादन युवक-युवतींना संबोधित करताना विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी केले.
अशा कार्यक्रमात तुम्हाला नेहमी विशाल सेवा फाउंडेशन मदत करत राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवलीच्यावतीने आज अभंगवाणी कार्यक्रम पार पडला. यावेळी परब बोलत होते. यावेळी श्री.विश्वास प्रभुदेसाई, बुवा श्री.प्रकाश पारकर, श्री.सुदर्शन फोपे, श्री.पंढरीनाथ जाधव तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संगीत क्षेत्रातील या कार्यक्रमात सिंधुदूर्ग मधील विविध ३२ बुवांचा सत्कार करण्यात आला.
