दांडी येथे २२ रोजी कर्करोग जनजागृती कार्यक्रम

⚡मालवण ता.२०-:
मुंबई परेल येथील टाटा हॉस्पिटल नजीक असणाऱ्या व्ही केअर या कॅन्सर रुग्णांवर केंद्रित स्वयंसेवक संचालित संस्था गेल्या २८ वर्षांपासून कॅन्सरच्या रूग्णांना आजार नियंत्रणाची काळजी घेण्यास सक्षम बनवत आहे. या संस्थेमार्फत मालवण शहरात दांडी चौकचार मंदिर येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता कर्करोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने कर्करोगा संबंधी माहिती देऊन आपण रोगाला योग्य वेळी कसे रोखू शकतो आणि कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती देणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी रश्मीन (राका) रोगे (९८६००२२११६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page