दहा महिन्यांपासून गटाराचे काम सुरू नाही

भाजप युवा नेते सौरभ ताम्हणकर यांची न प प्रशासनाला आठ दिवसांची डेडलाईन

मालवण दि प्रतिनिधी
नगरपालिका प्रशासनाने दहा महिन्यापूर्वी मालवण बाजारपेठेतील दलित वस्ती चर्मकार वसाहतीच्या रस्ता गटाराच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न झाल्याने मालवण भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी मालवण न. प. प्रशासनाला आठ दिवसाची डेडलाईन देतानाच येत्या आठ दिवसात हे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन झेडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान मालवण बाजारपेठेतील दलित वस्तीच्या या जिव्हाळ्याचा आणि गंभीर प्रश्नावर भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

मालवण बाजारपेठ दलित वस्ती चर्मकार वसाहत रस्ता गटाराचे बांधकाम करणे या सुमारे २८ लाख निधीतून होणाऱ्या कामाचे कार्यरंभ आदेश फेब्रुवारी २०२२ मध्ये देण्यात आले. मात्र, दहा महिने उलटले तरी अद्यापही काम सुरु झाले नाही. या प्रश्नी नागरिकांच्या तक्रारी वरून मालवण भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली मालवण नगर परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे काम जिल्ह्यातील एका ठेकदाराने घेतले असले तरी या कामाची पोट ठेकेदारी मालवण शहरातील एकाकडे असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करावे याबाबत पालिकेच्या माध्यमातून संबंधित ठेकेदारास सूचना देण्यात आल्या. मात्र, ठेकेदाराकडून काम सुरु झाले नाही. काही दिवसापूर्वी ठेकेदाराने मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून २६ ऑक्टोबर नंतर तात्काळ काम सुरु करण्यात येईल असे सांगत कामाला मुदतवाढ़ देण्याची मागणी केली होती. मात्र त्यालाही एका एक महिना उलटला तरी काम सुरु झाले नसल्याने ताम्हणकर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून व उपलब्ध कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जन हिताच्या दृष्टीने मंजूर झालेल्या कामांबाबत अशा प्रकारे दिरंगाई होत असेल तर याबाबत निश्चितच आवाज उठवला जाईल. ही बाब भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनानाने वा संबंधित ठेकेदाराने काम वेळेत सुरु न केल्यास माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील भूमिका घेतली जाईल असे ताम्हणकर यांनी स्पष्ट कले आहे.

You cannot copy content of this page