दोडामार्ग ते माणगाव पालखी पदयात्रेचे बांद्यात स्वागत

⚡बांदा ता.१९-: दोडामार्ग ते माणगाव पदयात्रेचे आज शनिवारी बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये मठात स्वागत करण्यात आले. दोडामार्ग येथिल श्रीपाद श्रीवल्लभ दत्तभक्त परिवार आयोजित या पालखी पदयात्रेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. ही पालखी पदयात्रा दोडामार्ग येथुन माणगाव येथिल  श्री दत्त मंदिरात जाते. बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये मठात पालखीचे सायंकाळी आगमन होताच मठातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीचे पुजन करुन महाआरती करण्यात आली. भाविकांच्या उपस्थितीत अखंड नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर पालखी इन्सुली येथे मार्गस्थ झाली.डोबाशेऴ येथे संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे वास्तव्य करुन पुढे प्रस्थान होईल.

You cannot copy content of this page