नट वाचनालय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर
बांदा/प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) हिने त्र लहान गटात श्रुतिका सुरेश राजगोळकर (जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर १) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तिसरी ते चौथी गटासाठी ‘साने गुरुजींची कथा’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात नील नितीन बांदेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १), पार्थ उमेश सावंत (सुधाताई कामत जि. प. शाळा नंबर २ सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्वरा कृष्णा गवस (जिल्हा परिषद शाळा मळगाव-कुंभार्ली), चैतन्य मनोज महाबळ (व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल, बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग’ हा विषय देण्यात आला होता. या गटात चिन्मय विक्रम कोटणीस (सावंतवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर २), अस्मि प्रवीण मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पूर्वा हेमंत मोर्ये (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १), नैतिक निलेश मोरजकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका गौरवी पेडणेकर व चंद्रकांत सावंत यांनी केले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन व (कै.) विजयालक्ष्मी विष्णू गावकर व (कै.) बिपीन विष्णू गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, विशाखा गावकर, पराग गावकर, सेवानिवृत्त प्रा. प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, संचालक निलेश मोरजकर, जगन्नाथ सातोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नाडकर्णी, शिक्षक जे डी पाटील, स्वाती पाटील, रीना मोरजकर, सुधाकर डेगवेकर, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब यांच्यासह पालक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे डी पाटील यांनी केले.
