जागतिक मत्स्य दिनानिमित्त आयोजन;दांडी मत्स्य प्रशिक्षण केंद्र येथे कार्यक्रम
मालवण दि प्रतिनिधी
मालवण दांडी येथील मत्स्य प्रशिक्षण केंद्र येथे २१ नोव्हेंबरच्या जागतिक मत्स्य दिनानिमित्त जिल्ह्यातील मासेमार बांधव व मत्स्यकास्तकार यांना मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. २१ रोजी दुपारी ३.३० वाजता मत्स्य प्रशिक्षण केंद्र, दांडी येथे उपस्थित राहवे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी मत्स्य सहकारी संस्थांना केले आहे.
