निमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन;मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांचा उपक्रम
मालवण (प्रतिनिधी)
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे मालवण आडवण येथे शिवसेनेचे मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांच्या वतीने ५० ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मनोज मोंडकर, सौ. पूनम चव्हाण, संमेश परब, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, मोहन मराळ, पांडुरंग चव्हाण, उत्तम चव्हाण, चंदू चव्हाण आदी व इतर यावेळी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर यांनी दहा वर्षांपूर्वी बाळासाहेबांचे जाणे हा त्यावेळी सर्व शिवसैनिक व बाळासाहेबांबद्दल आदर असणाऱ्यांसाठी काळाकुट्ट दिवस ठरला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना पाहिले आहे. परंतु, त्यांच्या वयाची मंडळी आहेत त्यांचा आशीर्वाद घेतल्याने आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळेल. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण होती आणि हेच तत्व आजही तसेच आहे, असे खोबरेकर म्हणाले.
