मोहन मेस्त्री यांचे निधन

⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील राठीवडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, ठाणे जिल्हापरिषदेचे निवृत्त लेखाधिकारी, मालवण तालुका सुतार समाज मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री. मोहन बाळा मेस्त्री (काका) (वय ८२) यांचे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

मोहन मेस्त्री हे शांत व मनमिळावू स्वभावामुळे आणि समाजसेवेमुळे सर्वत्र परिचित होते. त्यांच्या जाण्याने राठीवडे गावात शोककळा पसरली आहे. मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरूण मेस्त्री यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, जावई नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page