तीवरे शाळेला टिव्ही भेट

श्री प्रतिष्ठान ठाणे संस्थेकडून उपक्रम;बालदिनी केले वितरण

⚡सावंतवाडी ता.१९-: श्रीप्रतिष्ठान ठाणे यांस कडून तीवरे वाळवेवाडी या शाळेला टीव्ही प्रदान करण्यात आला बालदिनाचे औचित्य साधून जि प शाळा तिवरे वाळवेवाडी शाळेला,श्री.प्रतिष्ठान श्रीनगर ठाणे यांजकडून40 इंची अँड्रॉइड टीव्ही शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा कदम यांच्याजवळ प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी हा स्मार्ट टीव्ही देण्यात आला आहे. तिवरे वाळवेवाडी शाळा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असून विद्यार्थ्यांना सुद्धा या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते याबद्दल मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांचं प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

श्रीप्रतिष्ठानचे विश्वस्त खजिनदार संतोष महादेव वाळवे हे तिवरे वाळवेवाडीतील ग्रामस्थ असून त्यांचं प्राथमिक शिक्षण याच गावात पूर्ण झाले आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त खजीनदार श्री.संतोष महादेव वाळवे उपस्थित होते, तसेच यासाठी प्रयत्न करणारे श्री.अमित प्रकाश वाळवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम.सविता गणेश वाळवे , अनिल वाळवे अनंत वाळवे,अमित वाळवे महेश वाळवे श्रीधर कदम श्री प्रकाश वाळवे श्रीमती उर्मिला वाळवे श्री .पृथ्वीराज वाळवे उपस्थित होते. अंगणवाडी सेविका श्रीम.अनिता वाळवे,तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नेहा कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच उपशिक्षक श्री.राजेंद्र कवडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page