आजगाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करा

उपवनरक्षक नंदकिशोर यांच्याकडे मनसे शिष्टमंडळाची मागणी

⚡सावंतवाडी ता.१८-: तिरोडा गुळदुवे आजगाव या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर यांच्याकडे केली
यावेळी उपवनसंरक्षकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.आज मनसेच्या शिष्टमंडळाने नुकताच पदभार स्वीकारलेले उपवनसंरक्षक एस.एस नवकिशोर रेड्डी यांची सदिच्छा भेट घेत. तसेच शुभेच्छा दिल्या.

तसेच सावंतवाडी तालुक्यातील विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.

यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उप तालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर, राजू कासकर, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रविण गवस, राजेश मामलेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page