खोटले येथील वृद्ध महिला बेपत्ता

⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील खोटले येथील
सिंधू विठ्ठल परब (वय ७५) ही वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची खबर तिच्या नातेवाईकांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधू परब या दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी घरातून निघून गेल्या तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. याबाबत बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली असून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page