रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा रायझिंग युथची स्थापना

अध्यक्षपदी अक्षय मयेकर

बांदा/प्रतिनिधी
रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बबन देशपांडे यांच्या उपस्थितीत रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा रायझिंग युथची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी अक्षय मयेकर तर सचिव पदी मिताली सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी रोटरी क्लब बांदा यांच्या वतीने बांदा शहरातील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, विद्युत कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बांदा शहरातील क्षय रोग ग्रस्त सात रुग्णांना धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे डीजी बबन देशपांडे, एजी निता गोवेकर, जिल्हा क्षयविभाग अधिकारी डॉ हर्षल जाधव, निक्षय मित्र संस्थेचे श्री. तीळवे, श्री. मोरजकर, बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सेक्रेटरी फिरोझ खान, खजिनदार बाबा काणेकर, शिवानंद भिडे, योगेश परुळेकर, दिगंबर गायतोंडे, सचिन मुळीक, संजय शिरोडकर, दिलीप कोरगावकर, स्वागत नाटेकर, सिद्धेश पावसकर, डॉ. जगदीश पाटील, सुदन केसरकर, सुनील राऊळ, राजाराम धारगळकर, तुषार धामापूरकर, संदीप देसाई, डॉ. भालचंद्र कोकाटे , रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, सेक्रेटरी मिताली सावंत, साईस्वरूप देसाई, संकेत वेंगुर्लेकर, मोईन खान आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page