कलसुलकर इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी;
मुंबई येथे झाला सत्कार
⚡सावंतवाडी ता.१५-: येथील जी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि गीव्ह इंडियन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भारतभर ५ ते १५ वयोगटातील शालेय मुलींसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशी दोन टप्प्यात विविध कलेवर आधारित स्पर्धा घेतली होती. त्यात शास्त्रीय नृत्यप्रकारात कळसुळकर इंग्लिश स्कूलच्या कु.स्वरांगी खानोलकर हिची निवड करण्यात आली असून तिला “बॉर्न टू शाईन”ही तीन वर्षासाठी असणारी ४.५ लाखाची स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. मुंबई बांद्रा येथे सत्कार समारंभ कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन तिला प्रदान करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल संस्थेकडून व सर्व स्तरातून कौतुक होते आहे.
