युवा रक्तदाता संघटनेने मानले आभार
⚡सावंतवाडी ता.१५-: उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसीस सुविधा बंद असल्यामुळे तालुक्यातील रूग्णांची गैरसोय होत असणारी गैरसोय युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी मांडत प्रशासनाच लक्ष वेधल होत. यानंतर तातडीने त्याची दखल घेत बंद असलेली डायलेसीस मशीन दुरुस्त करत रूग्णसेवेत कायम करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांसह रूग्णांचा नातेवाईकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
तर युवा रक्तदाता संघटनेचे देखील आभार मानले जात आहेत.
