मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय

१५ पैकी १५ जागांवर पॅनलची बाजी
महाविकास आघाडीच्या पॅनलचा उडवला धुवा

⚡मालवण ता.१४-:
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सावंतवाडी पाठोपाठ मालवण मध्ये भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेलने महाविकास आघाडीच्या श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचा धुवा उडवला. या निवडणुकीत १५ पैकी सर्वच १५ जागांवर भाजप प्रणित पॅनेलने यश संपादन केले

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. महाविकास आघाडी पुरस्कृत श्रीदेव रामेश्वर नारायण सहकार पॅनेल व भाजप पुरस्कृत श्रीदेव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेल यांच्यात ही दुरंगी लढत झाली. आज टोपीवाला हायस्कुल येथे सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण तीन मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण १२५६ व्यक्ती मतदारांनी व सर्व २९ संस्था मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी सायंकाळी ५ वाजल्यापासून खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होऊन रात्री ८ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होऊन यात भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी सर्व १५ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवला.

निकाल पुढीलप्रमाणे- संस्था मतदार संघ- विजयी उमेदवार – कृष्णा पांडुरंग चव्हाण (२० मते), राजन जगन्नाथ गावकर (१८), महेश बाळकृष्ण मांजरेकर (२०), प्रफुल्ल वासुदेव प्रभू (१९), अभय सखाराम प्रभूदेसाई (१९), राजेंद्र नारायण प्रभूदेसाई (१९). पराभूत उमेदवार- श्रीकांत बाबाजी बागवे (१०), अरुण शांताराम भोगले (११), उदय राजाराम दुखंडे (१०), सदाशिव नारायण महाभोज (१०), विठ्ठल लक्ष्मण नाईक (१०).

व्यक्ति सदस्य मतदार संघ (४ जागा) विजयी उमेदवार – विजय वसंत ढोलम (६७२ मते), महेश लक्ष्मण गावकर (६२२), गोविंद बाळकृष्ण गावडे (६१५), रमेश बापू हडकर (५८३), पराभूत उमेदवार- महेश मनोहर अंधारी (३६९), देवानंद मेघश्याम लुडबे (१०१), मनोज मंगलदास लुडबे (४२५), संतोष कृष्णा लुडबे (२४४), चंदन दयाळ पांगे (३४९), मनोज गोविंद राऊत (३१३). बाद मते – १३४.

महिला मतदार संघ (२ जागा)- विजयी उमेदवार- सरोज शिवाजी परब (६७५ मते) अमृता अशोक सावंत (६३३), पराभूत उमेदवार- साक्षी भगवान लुडबे (५०४) नीना गोविंद मुंबरकर (५०३). बाद मते- ६६.

भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ (१ जागा)- विजयी उमेदवार- अशोक लाडोबा तोडणकर (७२५ मते), पराभूत उमेदवार- मेघनाद गणपत धुरी (४९५), बाद मते- ६५.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ (१ जागा) – विजयी उमेदवार- सुरेश ज्ञानदेव चौकेकर (७१५ मते), पराभूत उमेदवार- नागेश बाबली अटक (४९२), बाद मते- ७८.

इतर मागास वर्ग मतदार संघ (१ जागा) – विजयी उमेदवार -कृष्णा हरिश्चंद्र ढोलम (७८७ मते), पराभूत उमेदवार – सुभाष राजाराम तळवडेकर (४३१), बाद मते- ६७.

You cannot copy content of this page