देवगडमध्ये ३८ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक

सर्वाधिक १३ सरपंच खुला प्रवर्ग तर १० खुला प्रवर्ग महिला यांच्यासाठी राखीव

⚡देवगड ता.१३-: देवगड तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहिर झाल्या असून थेट सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये अनुसूचित जमाती महिलासाठी १ व अनुसूचित जाती महिलांसाठी १ व सर्वसाधारसाठी १ओबीसी महिलांसाठी ५, ओबीसी सर्वसाधारण ७ , सर्वसाधारण महिलांसाठी १० तर खुला प्रवर्गासाठी १३ असे सरपंच पदासाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

यामुळे देवगड तालुक्यामधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकिमुळे पुन्हा एकदा राजकीय वारे वाहु लागले आहेत. सिंधुदूर्ग जिल्हयाच्या राजकीय पटलावरती देवगड तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्वाच्या मानल्या जात आहेत. देवगड तालुकयातील एकुण ७२ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामुळे निम्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या तालुक्यातील निवडणुका असल्यामुळे संपुर्ण तालुक्यामध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे. विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी साठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षाना या ठिकाणी सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी महिला उमेदवारीची शोधाशोध आतापासून सुरु झाली आहे. या होणार ग्रामपंचायतीच्या आरक्षणानुसार निवडणुका आरे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला बापर्डे- सरपंच पदासाठी आरक्षण खुला प्रवर्ग, बुरंबावडे- सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जाती जमाती महिला, चाफेड- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,चांदोशी- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,दाभोळे- सरपंच पदासाठी आरक्षण खुला प्रवर्ग, दहिबांव- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग, गवाणे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला ,गिर्ये- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला ,गोवळ- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,हडपीड- सरपंच पदासाठी आरक्षण सर्व साधारण महिला,हिंदळे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग,कटटा- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,खुडी- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,किंजवडे- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,कोटकामते- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,कुणकवण- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,कुवळे- रेंबवली- सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जाती ,महाळुंगे- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,मणचे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,मिठमुंबरी- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,नाद- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,नारिंग्रे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,ओंबळ- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,पडेल- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग,पाटगांव- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,पेंढरी- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,फणसे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,पोंभुर्ले- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,पोयरे- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,साळशी- सरपंच पदासाठी आरक्षण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,सांडवे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण,सौंदाळे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,तोरसोळे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,उंडिल- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला,वाघिवरे- सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण ,वाघोटन, सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिला ,विजयदुर्ग- सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जमाती महिला असे 38 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाचे आरक्षण आहे.

You cannot copy content of this page