देवगड येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

⚡देवगड ता.१३-: उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर – देवगड येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत पार पडली.

याचे उदघाटन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा तालुका विधी सेवा समिती- देवगडचे अध्यक्ष एस. बी. वाळके यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील २५९ पैकी ३१ खटले निकाली काढण्यात आले. तर एकूण ४१ लाख ९७ हजार ७७७ रुपयांची वसुली करण्यात आली.
तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. उद्घाटनप्रसंगी देवगड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अविनाश माणगावकर, अॅड. डी. आर. गोरे, अॅड. प्रकाश बोडस, अॅड. एस. व्ही. जोशी, अॅड. आय. व्ही. ठाकुर, अॅड. अभिषेक गोगटे, अॅड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, अॅड. प्रसाद करंदीकर, अॅड. मैथिली खोबरेकर, अॅड. संगीता कालेकर, अॅड. आशिष लोके, अॅड. सिद्धी सावंत, अॅड. विना लिमये, अॅड. मिल्केशा सांगळे, अँड. सिद्धेश माणगावकर, अॅड. विशाल देवगडकर, सरकारी वकील एस. टी. माळी आदी उपस्थित होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवगड व तिर्लोट शाखेने बँक ऑफ इंडियाच्या देवगड, मिठबाव, विजयदुर्ग, मोंड, शिरगाव, पडेल कॅन्टीन शाखेने, बँक ऑफ महाराष्ट्रच्या जामसंडे शाखेने बीएसएनएलच्या देवगड कार्यालयाने, तर वीज वितरण कंपनीच्या देवगड व आचरा विभागामार्फत वादपूर्व प्रकरणे मिटविण्यासाठी विशेष सहभाग दर्शविला होता. या लोकअदालतीमध्ये देवगड न्यायालयातील २५९ पैकी ३१ खटले निकाली काढण्यात आले. त्यापैकी दिवाणीकडील प्रकरणात एकूण ४ लाख ९५ हजार ५०२ रुपये व फौजदारीकडील कलम १३८ च्या प्रकरणात ६ लाख ८० हजार ४०० रुपये वसुली झाली. उर्वरित वादपूर्व प्रकरणात ३० लाख २१ हजार ८७५ रुपये एवढी रक्कम वसूल झाली. अशी एकूण ४१ लाख ९७ हजार ७७७ रुपये एवढी वसुली झाली. पॅनेलप्रमुख देवगड दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके व पॅनेल सदस्य म्हणून ऍड. आरती खाडीलकर यांनी पाहिले.
या लोकअदालतीसाठी देवगड पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण कुंभार, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी भारत फार्णे, संतोष डामरे, देवगड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप, श्री. हडपीडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी देवगड दिवाणी न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंदाने विशेष मेहनत घेतली.
फोटी देवगड येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उदघाटन करताना दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके. बाजूला अॅड. अविनाश माणगावकर, ॲड. डी. आर. गोरे, अँड. प्रकाश बोडस आदी.

You cannot copy content of this page