गुळदुवे गावात बिबट्याचा धुमाकूळ…

⚡सावंतवाडी ता.१२ सहदेव राऊळ -: सावंतवाडी तालुक्यातील गूळदुवे गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वारंवार येथील ग्रामस्थांच्या बिबट्या दृष्टीस पडत आहे. ग्रामस्थांच्या कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला केला असतानाच काल शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुळदुवे येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर हे आपले काम आटोपून मळेवाड येथून जात असताना मळेवाड गुळदुवे येथील सीमेलगत रस्त्याच्या कडेला असलेल्या बिबट्याने अचानक शेटकर यांच्या गाडी वर झेप घेतली. मात्र काही सेकंदातच गाडी पुढे घेतल्यामुळे बिबट्याच्या हल्यातून शेटकर सुटले. अशा या स्थितीत शेटकर यांचा थरकाप उडाला. मात्र बिबट्याच्या या वावरामुळे येथील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात करून रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाढलेली झाडी यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अशा झाडीमुळे बिबट्या किंवा अन्य प्राणी या झाडीमुळे सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. यामुळे ग्रामस्थांवर किंवा पाळीव प्राण्यांना या जंगली प्राण्यांचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page