मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील हडी येथील श्री पावणाई देवी मंदिराचा वार्षिक जागरोत्सव दि. १३, १४ व १५ नोव्हेंबर रोजी साजरा होत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त रविवार दि. १३ रोजी दु. ४ वा. हडी गाव रहाटीचे प्रस्थान- नागेश्वर मंदिर ते पावणाई मंदिर, रात्री १० वा. पालखी प्रदक्षिणा, सोमवार दि.१४ रोजी पूर्ण दिवस ओटी भरणी, रात्री ७ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री ९.३० वा. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा “शापित राजनंदिनी” हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर मंगळवार दि.१५ रोजी सकाळी ओटी भरणी कार्यक्रम, दु.१ वा. महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या जागरोत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव नागेश्वर पावणाईदेवी, कालिकादेवी, बाराचा पूर्वस देवस्थान कमिटी, हडी यांनी केले आहे.
