राजन तेली; भविष्यात याच निकालांची होईल पुनरावृत्ती
⚡सावंतवाडी ता.१२-: शिंदे गट – भाजपचे कार्यकर्ते तळागाळात लोकांपर्यंत पोचल्यामुळेच हा अपेक्षित विजय संपादन करता आला, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी खरेदी विक्री संघाच्या निकालानंतर व्यक्त केला.
दरम्यान सहकारामध्ये सुरू असलेली घौडदौड अशीच यापुढे देखील सुरूच राहील. सिंधुदुर्ग जनतेला हेच निकाल पाहायला मिळतील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. श्री. तेली यांनी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
