बालकांचे निरोगी राखण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभाग तत्पर

आरोग्य सहसंचालक डॉ सुमेध आंदुरकर यांचे प्रतिपादन

ओरोस ता.११-:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक मुलांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व आरबीएसके टीम कटिबद्ध आहे. बालकांना लहान मोठ्या आजारातून आजारमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची टीम चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन पुणे येथील कुटुंब कल्याण माता बाल संगोपन व शालेय आरोग्य सहसंचालक डॉ. सुमेध आंदूरकर यांनी जिल्हा रुग्णालय येथे बोलताना केले.
१० ते १३ नोव्हेंबर कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्त ० ते १८ वयोगटातील मुलांच्या इतर प्रवर्गातील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ डॉ आंदूरकर यांच्याहस्ते झाला. या शिबिरात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, भुल तज्ञ डॉ अपर्णा गावंकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे, सायन हॉस्पिटलचे बाल शल्य चिकित्सक डॉ.पारस कोठारी आणि डॉ.श्याम पाटील, बालरोग तज्ञ डॉ.ऋषिकेश शिवशरण, मुख्य औषध निर्माण अधिकारी अनिलकुमार देसाई, दयानंद कांबळी, आत्माराम गावडे, राजेश पारधी, विश्वनाथ राव, श्रीम.एकता वराडकर, आरबीएसके आणि त्यांची टीम तसेच व्यवस्थापक विक्रम कांबळी आणि त्यांची टीम उपस्थित होते.

You cannot copy content of this page