मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिराचा ३२ वा वर्धापन दिन महोत्सव २८ नोव्हेंबरपासून साजरा होणार आहे.
दि २८ रोजी साई सगुण पूजा, साई सतुचरित्र पारायण प्रारंभ होणार आहे. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पारंपरिक डबलबारी भजन सामना होणार आहे. वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके आणि गावदेवी भजन मंडळ, डोंबिवलीचे बुवा संजय पवार यांच्यात हा सामना होणार आहे. लोके यांना पखवाज साथ – योगेश सामंत व तबला साथ संदेश सुतार, तर पवार यांना पखवाज साथ रुपक कामतेकर व तबला साथ विनायक मोहिते करणार आहेत. ५ रोजी प्रातः पूजा, साई दुग्धाभिषेक, सायंकाळी ४ वाजता साई पादुका पालखी मिरवणूक होणार आहे. ७ रोजी दत्त जयंती उत्सव होणार आहे. यानिमित्त दुग्धाभिषेक सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद भंडारा होणार आहे. सायंकाळी साईंची महाआरती व रात्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापणचे नवीन नाट्यपुष्प ‘मोरया गोसावी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
