बांदा/प्रतिनिधी
विलवडे येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. देवींची ओटी भरणे, पूजा अर्चा, नवस बोलणे, फेडणे व रात्री पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री मामा मोचेमाडकर यांचा पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन गोपाळ दळवी (कुळकर), महादेव दळवी (स्थळकर), देवस्थान समिती अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो:-
श्री देवी माऊली.
विलवडे माऊली जत्रोत्सव १४ नोव्हेंबर रोजी
