⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला तालुक्यासह शहरात आज घरोघरी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गेले दोन दिवस तुलसी विवाहाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध वस्तूंची नागरिकांनी खरेदी केली.
कार्तिक शुद्ध द्वादशीला घरासमोरील असणा-या तुलसी वृंदावनाचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज विवाह समारंभ पार पाडण्यात आले. दुपारपासूनच ठिकठिकाणी मंगलाष्टका ऐकू येत होत्या. आजपासून सुरु झालेली तुलसी विवाह सोमवारपर्यंत चालणार आहेत. यावेळी प्रसाद म्हणून कुरमुरे वाटण्यात आले.
