⚡वेंगुर्ला ता.०५-: मठ येथील दीपावली शो टाईम ग्रुपच्यावतीने मठ हायस्कूलच्या पटांगणावर दि.६ व ७ नोव्हेंबर या कालावधीत दीपावली शो टाईम अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि.६ रोजी सायंकाळी ७ वाजता किशोर पोतदार ज्वेलर्स पुरस्कृत मठ गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धा, त्यानंतर माजी उपसरपंच नित्यानंद शेणई पुरस्कृत महिला व मुलांसाठी फनी गेम्स, दि. ७ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, माणगांव यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
