⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील मालोंड झरवाडी येथील रहिवासी तथा मालोंड बेलाचीवाडीचे माजी उपसरपंच व देव नारायण देवस्थानचे मानकरी रविकांत आत्माराम घाडीगावकर (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने उपचार सुरू असताना मुंबई येथे निधन झाले. गावातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात ते सक्रीय सहभागी व्हायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, भावजयी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
रविकांत घाडीगावकर यांचे निधन
