⚡सावंतवाडी ता.०४-: उमेश उर्फ अभिषेक प्रसाद सावंत याची महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदी निवड झाली.
मुंबई,नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री वगैरे यांचे उपस्थितीत पार म्हाडाच्या मुंबई वांद्रे येथील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या कार्यालयाकरिता निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
