नगरसेविका अरुणा पाटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची घेतली भेट

⚡देवगड ता.०४-: देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका अरुणा पाटकर यांनी महाराष्ट भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची मुंबई येथे भेट घेवून देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विकास कामांच्या निधीबददल चर्चा केली.

नुकत्याच भाजपा प्रदेश महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्राताई वाघ यांची निवड झाली असून नगरसेविकास अरुणा पाटकर यांनी भेट घेवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील उध्व ठाकरे शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे भाजपाच्या नगरसेविकांच्या वॉर्डमध्ये विकासकामांसाठी निधी कमी मिळत आहे. तरी या देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील भाजपाचे नगरसेवक असलेल्या वॉर्डमध्ये भरघोष निधी देण्यासाठी त्यांनी चित्राताई वाघ यांच्याशी चर्चा केली आहे.

You cannot copy content of this page