दोडामार्ग बाजारपेठेत १० पासून दीपावली शो टाईम

⚡दोडामार्ग ता.०४-: : दोडामार्ग बाजारपेठ वक्रतुंड मित्र मंडळातर्फे दीपावली शो टाईमनिमित्त दोन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

गुरुवार १० नोव्हेंबर रोजी बारा वर्षाखालील फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक रु. ४००० व चषक, द्वितीय रु.३००० व चषक, तृतीय रु. २००० व चषक, चतुर्थ रु. १००० व चषक, बारा वर्षाखालील लहान गट डान्स स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक रु. ४००० व चषक, द्वितीय रु.३००० व चषक, तृतीय रु. २००० व चषक, चतुर्थ रु. १००० व चषक, शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी बारा वर्षांवरील मोठा गट डान्स स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक रु. ५००० व चषक, द्वितीय पारितोषिक रु. ३००० व चषक, तृतीय पारितोषिक रु. २००० व चषक तसेच उत्तेजनार्थ प्रथम द्वितीय व तृतीय बक्षिसे आहेत. या सर्व स्पर्धा येथील पिंपळेश्वर हॉलमध्ये होणार असून ९ नोव्हेंबरपूर्वी इच्छुक स्पर्धकांनी मनोज पार्सेकर, विशाल चव्हाण, गोकुळदास बोंद्रे यांच्याशी संपर्क साधवा.

You cannot copy content of this page