दागिने चोरण्याचा प्रयत्न मात्र फसला
⚡आंबोली ता.०२-: आंबोली कामतवाडी येथील रहिवासी तथा प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख रामा गावडे यांच्या कामतवाडी येथील घरामध्ये कोणीही नसल्याचे बघून घराची कवले काढून घरामध्ये असलेल्या कपाटातील ६९ हजार रुपये चोरट्याने लंपास केले याबाबतची तक्रार रामा गावडे यांनी आंबोली पोलिस स्थानकात दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंकी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे तसेच श्वानपथक व फॉरेन्सिक लॅब ची टीम दाखल झाली. मात्र, श्वान हायवे पर्यंत घुटमळले.
रामा गावडे हे २६ ऑक्टोबर रोजी पुणे येथे सहकुटुंब गेले होते तेव्हापासून ते काल रात्रीपर्यंत ही चोरी झाल्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे रमा गावडे यांचे घर भर वस्तीत असूनही कुणालाच काही कळले कसे नाही याबाबत सुद्धा तर्कवितर्क लढवले जात असून रामा गावडे हे आपल्या घरी नाहीत याबाबतची माहिती चोरट्यांना कशी मिळाली यात चोरटे स्थानिक तर नाहीत ना असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे या चोरीचा छडा लावणे हे पोलिसांसमोर आता आव्हान ठरणार आहे.
