⚡मालवण ता.०२-:
मालवण देवबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या अशोक शांताराम आरेकर (वय ६५, रा. विक्रोळी मुंबई) या पर्यटकाचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचादरम्यान निधन झाले. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक आरेकर हे कुटुंबासमवेत ३१ ऑक्टोबर रोजी मालवणात पर्यटनासाठी आले होते. देवबाग येथील एका रिसॉर्ट येथे वास्तव्यास असताना काल मंगळवारी रात्री रिसॉर्ट बाहेर फेरफटका मारत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. याबाबत तपास पोलीस हवालदार सुभाष शिवगण हे करीत आहेत.
