मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील गावकरवाडा भागात असलेल्या शिधिया देवालय परिसरात मिनी हायमास्ट टॉवर उभारून हा भाग प्रकाशमय करण्यात आल्याने या भागातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षापासून स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी पूर्ण झाली आहे.
वायरी गावकरवाडा भागात शिधिया देवालय असून या देवालयाच्या परिसरात वीज पुरवठा मालवण नगरपालिकेच्या वतीने स्ट्रीट लाईटची सुविधा न दिल्याने त्या भागात काळोखाचे साम्राज्य होते. मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम हे काळोखाच्या साम्राज्यात पार पाडावे लागत होते. याबाबत नागरिकांनी मालवण नगरपालिकेकडे वेळोवेळी स्ट्रीट लाईटची मागणी केली होती. या मागणीनंतर माजी नगरसेवक तृप्ती मयेकर आणि सेजल परब यांच्या प्रयत्नातून आणि आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून मिनी हायमास्ट टॉवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी संबंधितांना धन्यवाद दिले आहेत.
