सातेरी जलमंदिर येथे 4 नोव्हेंबर पासून सात प्रहर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी
कसबा मसुरे गावची मूळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर येथे ४ रोजी सकाळी १० पासून सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार आहे. पूजा-अर्चा, पुराणवाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व नंतर १२ वा. चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व बिळवस ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page