स्वराभिषेक भजन मंडळाने पटकाविला प्रथम क्रमांक

झोळबे ग्रामस्थ आयोजित खुल्या भजन स्पर्धेचा निकाल जाहीर;सातेरी पुरावतवाडी मंडळ द्वितीय तर आजोबा कल्चरल तृतीय

⚡बांदा ता.०१-: झोळंबे गावातील भजन प्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भजन स्पर्धेत मणेरी (दोडामार्ग) येथील स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत माटणे (दोडामार्ग) येथील श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर केरी सत्तरी (गोवा) येथील श्री आजोबा कल्चरल असोसिएशने तृतीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (कलंबिस्त) आणि श्री देव रवळनाथ प्रासादिक प्रासादिक भजन मंडळ (पाडलोस) या भजन मंडळाची निवड करण्यात आली. या भजन स्पर्धेत उत्कृष्ट कोरस अभंग महिला भजन मंडळ (कुडाळ), उत्कृष्ट गायक गितेश कांबळे स्वराभिषेक भजन मंडळ (मणेरी) आणि गणेश शिरोडकर श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळ (माटणे), गौळण गायक हनुमंत गवस श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळ (माटणे), हार्मोनियम समीर नाईक स्वराभिषेक भजन मंडळ (मणेरी), तबलावादक, जानू शिरवलकर श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळ (माटणे), पखवाज दीपक मेस्त्री श्री देव रवळनाथ प्रासादिक प्रासादिक भजन मंडळ (पाडलोस), झांज गौरेश नाईक श्री मुसळेश्वर भजन मंडळ (मळेवाड), श्रोता नारायण दीपक गवस आणि सिद्धेश मनोहर झोळंबेकर यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, बाबाजी झेंडे, सुखाजी गवस, एन डी गवस, झोळंबे सरपंच राजेश गवस, उपसरपंच पांडूरंग गवस, परिक्षक विठठ्ल गावस, निलेश मेस्री, आनंद मोर्ये तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५५५५ रूपये, ३३३३ रूपये, २२२२ रूपये, तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना ११११ रुपयाची २ पारितोषिके आणि उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट गायक, गौळण गायक, हार्मोनियम, तबलावादक, पखवाज, झांज श्रोता यांना रोख रकमेची पारितोषिके आणि सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संदिप गवस यानी तर प्रास्ताविक व आभार जगदिश गवस यानी मानले.

You cannot copy content of this page