परप्रांतीय ठेकेदाराकडून कामगाराला घरात घुसून मारहाण

कामगाराने केली तक्रार,ठेकेदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

⚡सावंतवाडी ता.०१-: आपण केलेल्या कामाचे पैसे मागत शिवीगाळ केल्याच्या रागातून परप्रांतीय ठेकेदाराने कामगाराला घरात घुसून मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा परिसरात घडली.

या मारहाणीत अखिलेश धरमदेव तिवारी (३८, मूळ रा. बिहार ) याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर संशयीत विजयकुमार संतराम चौधरी (मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. माजगाव नाला), याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page