स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एस. ए. ठाकूर

⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एस. ए. ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून महाविद्यालयात आयोजित पदग्रहण समारंभ डॉ. ठाकूर यांच्याकडे प्राचार्य पदाचा पदभार सोपविण्यात आला.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून डॉ. श्रीरंग मंडले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. उज्वला सामंत यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, आता कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एस. ए. ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, ऍड. समीर गवाणकर, डॉ. डी. एल. भारमल, साईनाथ चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, डॉ. शशिकांत झाटये, महेश काळसेकर, प्रमोद ओरसकर, संदेश कोयंडे, सौ. ज्योती तोरसकर, श्री. नाईक साटम, अमेय देसाई, अभय कदम व इतर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. बी. एच. चौगुले यांनी केले. तर आभार प्रा. एच.एम. चौगले यांनी मानले.

You cannot copy content of this page