कणकवलीतील सा. बां. उपअभियंता गणेश कर्वे यांचे निधन

⚡कणकवली ता.०१-: सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (४५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

त्यांच्या काम करण्याच्या सकारात्मक पद्धतीमुळे वर्षभरातच तालुक्यात अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते.गेले काही महिने गणेश कर्वे यांना पोट विकाराचा त्रास होता व त्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. मूळ फलटण येथील असलेले कर्वे हे गेल्या काही वर्षांपासून सातारा येथे स्थायिक झाले होते.

वर्षभरापूर्वी कणकवलीचे उपअभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत अनेक कामे मार्गी लावली होती. त्यामुळे अल्पावधीतच तालुक्यात त्यांचे नाव झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा येथे रवाना झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अकाली निर्णयाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page