जीवन स्रोत सेवा संस्थेच्यावतीने हृदय तपासणी शिबीर

⚡कणकवली ता.०१-: जीवन स्त्रोत सेवा संस्थेच्यावतीने हृदयाची मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात २५ महिलांची तपासणी करण्यात आली.

वाढता ताण तणाव व धकाधकीचे जीवन यामुळे आपल्या दिनचर्येत बराच फरक पडत आहे, यात सर्वात जास्त महिला वर्ग आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहे या बाबी लक्षात घेता जीवनस्त्रोत सेवा संस्थेच्यावतीने संस्थेच्या अध्यक्षा शीतल मांजरेकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपलं आयुर्वेद शास्त्र तेव्हाही संपन्न होत आणि यापुढेही राहावे, याउद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. विनाशत्रक्रिया हृदयविकारावर आयुर्वेदिक उपचार होवू शकतो. माधवबागमध्ये आधुनिक तपासणीद्वारे हृदयाची स्ट्रेस टेस्ट करण्यात आली, या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page