समीर नलावडे;स्वयंदीप ट्रस्टची उद्योजकता प्रेरणा कार्यशाळा
⚡कणकवली ता.०८-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीच्या माध्यमातून व स्वयंसिध्दा कोल्हापूर यांच्यामार्फत एक दिवसीय उद्योजकता प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
त्यावेळी स्वयंसिध्दाच्या संचालिका कांचनताई परुळेकर, सौ तृप्ती पुरेकर, डॉ. सौ शमिता बिरमोळे, सौ. अश्विनी तावडे, सौ. शुभदा कलंगुटकर (गोवा), lस्वंयदिप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव संतोष सावंत, मनिषा सावंत, सिद्धी सावंत, माधुरी सावंत व तनिष्का सावंत उपस्थित होत्या.
समीर नलावडे यांनी स्वंयदीप ट्रस्टने महिलांकरिता चांगल्या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले व महिलांच्या विकासाच्या दृष्टीने ट्रस्टमार्फत जे जे उपक्रम राबविले जातील त्यांत त्यांनी स्वतः नगराध्यक्ष म्हणून व कणकवली नगरपंचायत, कायम सहकार्य करतील असे आश्वासन दिले . तसेच स्वयंदीप ट्रस्टच्यावतीने महिलांनी बनविलेल्या पदार्थांचां आठवड्यातून एक दिवस बाजार भरविला जाणार आहे. त्यासाठी नगरपंचायतीचा हॉल उपलब्ध करून दिला जाईल असे नलावडे म्हणाले.
कांचनताई परुळेकर म्हणाल्या, जास्तीत जास्त महिलांनी उद्योगाकडे वळले पाहिजे . दैनंदिन जीवनात लोकांना काय काय लागतं, त्यानुसार उद्योग करायला पाहिजे . त्यासाठी स्वयंसिद्धा ही कायम स्वयंदीप ट्रस्टच्या पाठीशी उभी राहील व महिलांना उद्योजक बनविण्यासाठी सदैव सहकार्य करेल .
स्वयंदीप ट्रस्टचे संदीप सावंत यांनी सांगितले की , कणकवली मध्ये कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र ट्रस्टमार्फत सुरू करण्यात आले आहे . त्या ठिकाणी विविध प्रकारची प्रशिक्षणे बचत गट तसेच मुलांकरिता प्रशिक्षणे देण्यात येणार आहेत व महिलांनी बनविलेल्या मालाची विक्री होण्याकरिता आठवडा बाजार राबविण्यात येईल असे सांगितले .
या कार्यशाळेमध्ये स्वयंसिद्धाच्या प्रशिक्षिका सौ .शैलजा सुतार, सौ .मिनल भोसले व सौ. प्रिया भुयेकर यांनी छान प्रकारे उद्योग कसा करावा, त्याचे पॅकिंग व मार्केटिंग कसे करावे याबाबत माहिती दिली .
या कार्यशाळेत मेणबत्ती, बांधणी, शेंगदाणा चिक्की , काजू मोदक, फणसाची टॉपी, चिंच सॉस, पॉपकॉर्न, राजगिरा लाडू, खारी डाळ, मेणाच्या वस्तू, राखी आकाश कंदील, हस्तकला, वाकाच्या वस्तू, पॅकिंग बॉक्स या सर्व वस्तूंचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले . कणकवली व आजूबाजूच्या गावातील साधारण 40 महिला व पुरुषांनी या कार्यशाळेत भाग घेऊन याचा लाभ घेतला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनिष्का सावंत हिने केले . प्रास्ताविका व कार्यशाळेचा उद्देश संदीप सावंत यांनी सांगितला व आभार सौ . मनिषा सावंत यांनी व्यक्त केले . कार्यशाळे बद्दलचे मनोगत डॉ. सौ बिरमोळे व शुभदा कलंगुटकर यांनी व्यक्त केले .
