कळसुली,जानवली,कलमठ जि.प. विभागात उदया शिवसेनेच्या बैठका

आ. वैभव नाईक, सतिश सावंत, संदेश पारकर मार्गदर्शन करणार

⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कळसुली, जानवली, कलमठ या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या बैठका उद्या मंगळवार ९ ऑगस्ट २०२२ रोजी त्या त्या विभागात होणार आहेत. सायं. ३ वाजता कळसुली विभागाची बैठक ओसरगाव गवळवाडी येथील सदा मोरे यांच्या घरी होणार आहे. सायं ५ वा. जानवली विभागाची बैठक जाणवली ,सखलवाडी येथील सत्यवान राणे यांच्या घरी आणि सायं.६:३० वा. कलमठ विभागाची बैठक कलमठ विलास गुडेकर यांच्या घरी होणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर,अतुल रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, महिला संघटक नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,सचिन सावंत,राजु राठोड, रामू विखाळे, बाळा भिसे आदींसह जि. प. सदस्य, उपस्थित राहणार आहेत.

तरी या बैठकांना महिला तालुका संघटक, युवासेना तालुका अधिकारी, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग प्रमुख (युवा व महिला), उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख ,सरपंच, उपसरपंच, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, ग्रा. पं. सदस्य, बुथप्रमुख,शिवसैनिक व सर्व माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page